सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
गेले अनेक दिवस मेढा नगरपंचायत हद्दीमध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासत असून जनता पाणी देताय का हो पाणी असा टाहो फोडत असताना दिसत आहे. मेढ्यातील नागरिकांवर अशी पाणी टंचाईची परिस्थिती प्रशासनाच्या गलथान कारभार निर्माण झाली आहे असा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहेत.
वेण्णा नदी मध्ये सध्या मुबलक पाणी असताना मेढा नगरीवर पाणी टंचाईची वेळ येत आहे. नगरपंचायत आथिर्कदृष्ट्या कमकुवत झाली असल्याचे ऐकीवात येत असले तरी जनतेच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. पाणी उषाला अन कोरड घशाला अशी अवस्था सामान्य माणसाची झाली आहे. ऐन दिवाळीत अनेक जण मुंबई पुण्यावरून गावी सुट्टी घालविण्यासाठी आलेली असताना कुटुंबात पाण्याचा तुटवडा भासत असल्याने अनेकांनी सुट्टी अर्धवट सोडून परगावी जाणे पसंत केले आहे.
वेण्णा नदी पात्रातुन होणारा पाणी पुरवठा करणारी मोटर बिघडल्याचे कारणात्सव कर्मचारी जनतेला वेटीस धरत आहेत तर नगर पंचायत हद्दीतील बोअर व विहीर मधील पाणी उपसा करून नगर पंचायत कर्मचारी काहींची तहान भागविण्यात धन्यता मानत आहेत त्यामुळ कही खुशी गम परिस्थिती नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे निर्माण झाली आहे.
मेढ्यातील रहिवाशी पाण्यासाठी गत दहा पंधरा दिवस झाले वनवन भटकंती करत असून पिण्याच्या पाण्याची सोय न झाल्यास आंदोलन करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या वार्ड मध्ये ( विभागात ) पाणी पुरवठा होत नाही अशा ठिकाणी टॅकर द्वारे पाणी पुरवठा व्हावा अशीही मागणी होताना दिसत आहे.
COMMENTS