सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
कर्नलवाडी (ता.पुरंदर) ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली. सरपंचपदी थेट जनतेतून सुवर्णा तानाजी महानवर यांची निवड झाली होती. सदस्यांच्या पहिल्या बैठकीत उपसरपंचपदी नंदकुमार वसंतराव निगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या सुवर्णा महानवर या सरपंचपदी बहुमताने निवडून आल्या होत्या. सात सदस्यांपैकी चार सदस्य या आघाडीचे आले होते. तर तीन सदस्य विरोधी गटाचे आले होते. यावेळी नुक्तेच निवडून आले सदस्य स्वप्नील निगडे, अनिल निगडे, अनिता कर्णवर, आशा चव्हाण, प्रतिक्षा महानवर, कपिल कोंडे उपस्थित होते.
बुधवार दि. २२ रोजी निवडून आल्या सरपंच व सदस्यांची पहिली बैठक व उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंचपदासाठी नंदकुमार निगडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यांना सदस्या स्वप्नाली विराज निगडे या सउचक म्हणून होत्या. निर्धारित वेळेत इतर कोणाचाही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक जयंद्र सुळ यांनी नंदकुमार निगडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी नुक्तेच निवडून आले सदस्य स्वप्नील निगडे, अनिल निगडे, अनिता कर्णवर, आशा चव्हाण, प्रतिक्षा महानवर, कपिल कोंडे उपस्थित होते. सभा सुरू होण्याआधी माजी सरपंच सुधीर निगडे व माजी उपसरपंच धनराज कोंडे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा पुष्पगुच्छ व लेखक प्रवीण जोशी लिखित माणूसकीचा गाव पुस्तक भेट देण्यात आले.
COMMENTS