सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत गुळूंचे येथे सरपंच सम्राज्ञी कौस्तुभ निगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकसाठी दिपक आनंदराव निगडे यांचा एकमेव अर्ज दाखल झालेने त्यांची ग्रामपंचायत गुळूंचे उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
यावेळी उपस्थित नवनिर्वाचित सदस्य हेमलता हनुमंत निगडे, शितल शेखर कर्णवर, ज्ञानेश्वर शंकर पाटोळे, तानाजी बजाबा निगडे, कविता शंकर निगडे, वैशाली राजेंद्र फरांदे, आरती भगीरथ निगडे, अमृता नितीन निगडे उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक जगदाळे व तलाठी लोंढे तसेच मंडल अधिकारी मोरे यांनी कामकाज पाहिले.