सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सासवड : प्रतिनिधी
बहुतांशी प्रत्येक गावात महार समाजाच्या लोकांना हाडकी, हाडावळा,महारकी अशा प्रकारची जमीन वतन आहेत.त्याचप्रमाणे सासवड येथील गावाला लागूनच सर्व्हे नंबर93,94,95 या मध्ये महार वतन ची जमीन आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की वरील सर्व्हे नंबर असलेले क्षेत्र हे महार वतन चे क्षेत्र आहे.हे क्षेत्र जवळपास एकूण 20 एकर इतके आहे.पूर्वीपासून हलके काम करणारे गाव नोकर म्हणून उल्लेख असलेल्या महार लोकांना बेदर चा बहामणी बादशहा याने अमृतनाक महार याला ही सनद दिल्याचे काही लेखी पुरावे आढळून् येतात. त्यानुसार सासवड येथील या समाजाला हे वतन मिळालेले आहे.महार वतन हे इनाम वर्ग 6 ब चे क्षेत्र हस्तांतरीत करित असताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन शासकीय नजरांना भरून मगच जमिनीची विक्री होते.तसे क्षेत्र विकता येत नाही.शासन निर्णया नुसार काही वर्षांपूर्वी एक ठराविक नजरांना भरून जमीन रिग्रँड झालेली आहे. या जमिनी मधील काही खातेदारांनी यातील काही क्षेत्र विकलेले आहे.तर उर्वरित क्षेत्र शिल्लक आहे.यातील शेत जमीन पुण्यातील डी. डी.पवार् यांनी विकत घेतलेलं आहे.या व्यक्तीने स्वतः खरेदी घेतलेल्या क्षेत्रावर ताबा घालण्या ऐवजी या संपूर्ण महार वतन क्षेत्रावर मुंबई स्थित गवळी टोळीतील गुंडांना सोबत घेऊन लोखंडी पत्र्याचे कंपाउंड घालून ताबा घातलेला आहे.
या मूळ जमीन मालक असणारे रणपिसे,साबळे, चौरे यांना या गुंडांनी धाक दडपशाहीने भीती दाखवून संपूर्ण क्षेत्रावर ताबा घातलेला आहे.याचा अर्थ या डी.डी पवार या व्यक्ति चा हे संपूर्ण क्षेत्र लुबाडण्याचा डाव आहे असे मत पत्रकार परिषदे वेळी बोलतांना रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी व्यक्त केले.या संबंधीचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना दिले .त्याचबरोबर सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष जाधव यांना देखील तसे निवेदन दिले आहे.यामध्ये धिवार यांनी असे सांगितले की पंधरा दिवसात जर या क्षेत्रावरील कपाउंड निष्कसित करण्याचे व डी.डी .पवार व त्याचे गुंड यांचेवर गुन्हा दाखल केला नाही तर टीवर स्वरूपाचे आंदोलन केले जाईल .असे म्हणाले.
COMMENTS