Baramati News ! सोमेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कुऱ्हाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रोड लगत असणाऱ्या झाडांच्या फांद्या खाली आल्या कारणाने ऊस वाहतूक करताना वाहनांमधील ऊस खाली पडून शेतकरी सभासदांचे नुकसान होत आहे.       तसेच या कारणाने रस्त्यावरती वाहतूकीसाठी अडचण होत आहे.
        काल दि. १० रोजी झाडांच्या फाद्यां काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. सुळ आले होते. पण झाडांची संख्या जास्त असल्याने तसेच झाडावरती चढून फांद्या कट कराव्या लागणार असल्या कारणाने कामगारांकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे ते काम आज दि ११ रोजी सकाळी लवकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. 
        कारखाना प्रशासनाला शासकीय विषय असल्याकारणाने  त्याठिकाणी स्वतःची यंत्रणा वापरण्यासाठी अडचण होती.
मात्र आज कारखाना प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने सर्व अडथळा असणाऱ्या झाडांच्या फ्यांद्या काढल्या गेल्या. करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रोड लगत असणाऱ्या झाडांच्या खाली आलेल्या फांद्या काढण्याचे काम आज सकाळी ७.३० वाजल्या पासून सुरू करण्यात आले होते.
To Top