सुपे परगणा ! सुप्यात रोटरी क्लबच्या वतीने हॅप्पी किटचे वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील सुमारे ४० गरजु कुटुंबांना रोटरी क्लबच्यावतीने हॅप्पी किटचे वाटप करण्यात आले. 
       सुपे येथील उपबाजार समितीच्या गणेश मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.cयेथील रोटरी क्लब ऑफ सुपे परगणा, निसर्ग स्पर्श फाउंडेशन सुपे आणि स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघ सुपे परगणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. 
         रोटरी क्लबच्यामाध्यमातुन येथील वार्ड क्रमांक पाच मधील कचरा व प्लास्टिक मुक्त वार्ड ही संकल्पना लवकरच हाती घेणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष हनुमंत चांदगुडे यांनी दिली. तसेच शहाजी विद्यालयातील मुलांचा इन्ट्रॉक्ट रोटरी क्लब स्थापन करण्यात आला आहे. यावेळी त्यांना प्रशिक्षणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
      तर निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या गडकिल्ले स्पर्धेमध्ये ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रथम येणाऱ्या चार स्पर्धकांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कम तर इतरांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास वाघचौरे यांनी दिली. तसेच सरकारी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
       याप्रसंगी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे, क्लबचे अध्यक्ष हनुमंत चांदगुडे, ग्रा. पं. सदस्य विलास वाघचौरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक बसाळे, माजी जि. प. सदस्य बापूराव चांदगुडे, अनिल हिरवे, अशोक लोणकर, संपतराव जगताप, राहुल भोंडवे, सुरेश फडतरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक लोणकर यांनी केले. तर आभार विलास वाघचौरे यांनी मानले. 
         ..........................
To Top