Phaltan News ! 'श्रीदत्त इंडियाचे' ३ हजार १०० रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  
साखरवाडी : गणेश पवार
साखरवाडी तालुका फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२३/२४  साठी गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१०० रुपये प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली. 
             चालू गळीत हंगामात दिनांक १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ७६ हजार २०० मॅट्रिक टन उसाची  २३ कोटी ६ लाख ७६ हजार रुपये रक्कम एकूण १३११ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे चीफ अकाउंटंट अमोल शिंदे यांनी दिली  यावेळी चालू हंगामात फलटण तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्री दत्त इंडिया साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहन अजितराव जगताप यांनी केले केले यावेळी कारखान्याचे केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश  बागणवर, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते
To Top