Baramati News ! तरडोलीच्या विद्यमान सरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत तरडोली येथील विद्यमान सरपंच विद्या हनुमंत भापकर यांच्या विरोधात महेंद्र जिजाबा तांबे व इतर सहा  सदस्यांनी अविश्वास ठराव बारामती तहसीलदार यांकडे सादर केला आहे. यानुसार बारामती तहसीलदार गणेश शिंदे  यांनी दि. १५   डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस  बजावली आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी की, तरडोली येथील ग्रामपंचायत निवडणूकीनंतर  सरपंच निवड १५ डिसेंबर रोजी झाली होती. यानंतर विद्यमान सरपंच भापकर  विरोधी ७ सदस्यांनी  स्वतंत्र फळी निर्माण करुन अविश्वास ठराव सादर केला आहे. यामध्ये महिंद्र जिजाबा तांबे, नवनाथ जयसिंग जगदाळे, अश्विनी श्रीकांत गाडे, स्वाती सतीश गाडे, सागर पंडित जाधव, अनिता उत्तम पवार, नबाबाई सोमनाथ धायगुडे यांनी विविध आरोप विद्यमान सरपंच विद्या भापकर यांच्यावर ठेवत अविश्वास  ठराव दाखल केला आहे.
         ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, निधीचा गैरवापर, मनमानी पद्धतीचे कामकाज चालविणे  व पतीचा कामकाजात  हस्तक्षेप यांसारखे गंभीर आरोप ठेवत ७ सदस्यांनी  आज दिनांक ११  रोजी बारामती तहसीलदार यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरावावर विशेश सभा  दिनांक १५  डिसेंबर रोजी होणार असून सर्व सदस्यांना हजर  राहण्यास नोटीस बजावली आहे.
To Top