Wai News ! बावधन येथे अल्पवयीन युवतीवर बलात्कार : एकावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील बावधन येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अल्पवयीन युवतीवर दि.9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता बलात्कार केल्याप्रकरणी बावधन येथील मदन सुभाष चव्हाण (वय 33, रा.बावधन) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  त्याला अटक करण्यात आली आहे. 
        वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्यातील बावधन येथील मदन चव्हाण नावाच्या युवकाने 16 वर्षाच्या मुलीला दुचाकीवर बसवून फिरायला नेले. त्याने फिरवून आणून बावधन गावच्या रस्त्याच्या कडेला त्याच्या मित्राचे एक पत्र्याचे शेड आहे. त्या शेड मध्ये त्याने त्या मुलीवर मदन चव्हाण याने अत्याचार केला. याचा गुन्हा दाखल होताच वाई पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
To Top