सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रमोद पानसरे
बारामती तालुक्यातील मागील महिन्यात मुढाळे येथील भाऊ अँड फ्रेंड या व्हाट्स अप ग्रुपवर तर आज कोऱ्हाळे येथील आम्ही कोऱ्हाळेकर या व्हाट्स अप ग्रुपवर अचानक एका ग्रुप सदस्याच्या व्हाट्स अप नंबरवरून अश्लील फोटो पडल्याने एकच खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या विविध घटना आणि त्यादरम्यानच समोर येणारी सायबर क्राईमची प्रकरणे पाहता ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया अकाउंट अशा माध्यमांमध्ये सतर्क राहण्याचीच गरज आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात येत आहे. प्राथमिक स्तरावर तोडगा न निघाल्यास तातडीने संबंधित यंत्रणांकडे याची नोंद करणे महत्त्वाचे आहे. व्हाट्स अप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. व्हाट्स अप या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, चॅट, फाइल्स, ऑडिओ-व्हिडीओ कॉल करता येत असल्याने हे अतिशय पॉप्युलर App ठरलं आहे. परंतु व्हाट्स अप चा वापर करताना सतर्क राहण्याची गरज आहे. व्हाट्स अप वर फसवणुकीसाठी हॅकर्सनी एक नवा मार्ग काढला आहे. बारामती तालुक्यातील गेल्या महिन्यात मुढाळे येथील एका व्हाट्स अप ग्रुप तर आज कोऱ्हाळे बु परिसरातील हॅकर्सनी व्हाट्स अप हॅककरून वेग वेगळ्या ग्रुपवर सकाळ पासून अश्लील संदेश व फोटो पाठवले आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत तज्ञानचा सल्ला असा आहे की, आपले कुटुंब किंवा मित्रपरिवार यांपैकी कोणालाही एसएमएस वेरिफिकेशन कोड न सांगण्याचा सल्ला व्हॉट्सॲपकडून देण्यात आला आहे. तुम्ही यापूर्वीच असे केल्यास तातडीने अकाउंट रिकव्हर करण्याची पावले उचलली जाण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट जर हॅक करण्यात आले असेल तर पुढील उपाय करा.
----------------------
अकउंट हॅक झाल्याचे कळताच काय करावे?
अकाउंटचा कोड वगैरे माहिती अनपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचून अकाउंटवर इतर कोणाचे नियंत्रण आल्याचे लक्षात येताच मित्रपरिवार, तुमच्या संपर्कातील मंडळी यांना शक्य तितक्या लवकर याबाबतची माहिती द्या. पुढची पायरी म्हणजे तुमच्या दूरध्वनी क्रमांच्या अर्थात फोन नंबरच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर लॉगईन करा. ज्याअंतर्गत तुम्हाला ६ आकडे असणारा एक वेरिफिकेशन कोड एसएमएसच्या माध्यमातून तुमच्या फोन नंबरवर देण्यात येईल. हा कोड वापरून लॉगईन केल्यास तुमचे अकाउंट दुसरे कोणी वापरत असल्यास आपोआपच ते लॉगआऊट झालेले असेल.कशी होते फसवणूक या घोटाळ्यात स्कॅमर प्रथम तुम्हाला तुमच्या मित्रांपैकी एकाच्या नावाने संदेश पाठवतात. आणि दावा करतात की तुमचा मित्र अडचणीत आहे. अनेक वेळा हे हॅकर्स तुमच्या मित्राच्या नंबरवरूनच मेसेज पाठवू शकतात. हे हॅकर्स तुमच्या मित्राचा फोटो डीपीमध्ये टाकून तुमची दिशाभूल करतात. त्यानंतर तुम्ही त्याच्याशी बोलायला लागताच, हॅकर तुम्हाला ओटीपी मागणारा मेसेज पाठवतो. हॅकर तुम्हाला सांगेल की त्याने तुमच्या नंबरवर चुकून मेसेज पाठवला आहे, कृपया तो फॉरवर्ड करा, पण सत्य हे आहे की हॅकरला ओटीपीद्वारे तुमचे खाते हॅक करायचे आहे. तुम्ही ओटीपी सांगताच तुमच्या नंबरवरून हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू होते. नवीन डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करण्यासाठी, एक ओटीपी आवश्यक आहे, जो हॅकर तुमच्याकडून मागतो. यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅकरच्या ताब्यात जाते. आता हॅकर तुमच्या नंबरवरून तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना मेसेज पाठवून पैसे मागतो आणि ब्लॅकमेलही करतो. हा प्रकार टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ओटीपी कोणासोबतही शेअर न करणे आणि व्हॉट्सअॅपवर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे. यानंतर ओटीपी व्यतिरिक्त, एक कोड देखील आवश्यक असेल जो फक्त तुमच्याकडे असेल. व्हॉट्सअॅपवर कोणाशीही पैसे पाठवण्यापूर्वी किंवा महत्त्वाची माहिती शेअर करण्यापूर्वी त्याचा नंबर तपासा, नंबर आठवत नसेल तर जुने चॅट तपासा. हे तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात. ती व्यक्ती खरोखर तुमची ओळखीची व्यक्ती आहे की फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा फसवणूक करणारा आहे. त्यामुळे कोणत्याही किंमतीत ओटीपी शेअर करण्याची चूक करू नका.
COMMENTS