सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
आसले, ता. वाई येथील दरवेश इलेक्ट्रीक नावाचे दुकान फोडुन घरफोडी करुन इलेक्ट्रीक साहित्य चोरणा-या आरोपीस अटक, ५२ हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.
दि. २५ मे २०२३ रोजी रात्री ०९.३० वा. ते दि. २७/०५/२०२३ रोजीचे सकाळी १०.३० वा. चे दरम्यान आसले, ता. वाई गावचे हद्दित दरवेश इलेक्ट्रीक नावचे दुकानाचे शटर तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करुन दुकानातील एकूण १ लाख ३४ हजार किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य चोरी केल्याबाबत दिले फिर्यादीवरुन भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरचा गुन्हा उघड करणेबाबत समीर शेख (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक सातारा, अंचल दलाल (भा.पो.से.). अपर पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचिम, उप-विभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गुन्हयाचे तपासी अधिकारी स.पो.नि. रमेश गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार रविराज वर्णकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकास वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास करणेबाबत आदेश देण्यात आले होते. सदर तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळचे आसपासचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. प्राप्त सीसीटीव्ही फुटेज सर्व बातमीदारांना दाखवून बातमीदारांकडून फुटेजमधील अज्ञात व्यक्ती कोण आहे याची माहिती प्राप्त केली. त्यावेळी फुटेजमध्ये दिसणारा चोरटा हा सुरुर, ता. वाई गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाल्याने त्याबाबत अधिक माहिती प्राप्त करुन त्यास दि. २७/१२/२०२३ रोजी सुरुर, ता. वाई येथून ताब्यात घेवून त्यास गुन्हयात अटक करुन पोलीस कोठडी दरम्यान त्याचेकडून ५२,०२०/- रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु असुन उर्वरीत मुददेमाल हस्तगत करण्याची कार्यवाही चालु आहे.
समीर शेख (भापोसे), पोलीस अधीक्षक सातारा, आँचल दलाल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक सातारा, बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे, पोउनि विशाल भंडारे, पोलीस अंमलदार नितीन जाधव, सुशांत धुमाळ, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS