सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या वेशीपर्यंत कोरोना येऊन पोहोचल्याने तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालय भोर येथे कोरोना संशयित रुग्णांची तपासनी करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली.मागील चार दिवसात २५० सर्दी, खोकला,ताप तसेच अशक्तपणा असणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदीपकुमार कापशिकर यांनी दिली.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे,भोंगवली, जोगवडी,आंबवडे,हिर्डोशी,भुतोंडे,नसरापूर तसेच उपजिल्हा रुग्णालय भोर येथे दररोज ऐकून ७० च्या आसपास २६ डिसेंबर पासून रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.कोरोना पसरणार नाही याची तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतःच घेणे गरजेचे असून गर्दीत जाऊ नये, पूर्वीसारखे मास्क वापरणे ,सॅनिटायझरचा वापर करणे तसेच वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप असे आजार असल्यास स्वतःची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सध्या एकूण रुग्णांच्या तपासणीमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आले नाही. तर लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असेही डॉ.कापशीकर यांनी सांगितले.
COMMENTS