सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कष्ट करून कठीण परिस्थितीमध्ये कुटुंबाचा चरितार्थ चालवून छोट्या शॉप मधून काम करीत उद्योजक होण्याची स्वप्ने पहात गुणवत्तेच्या आधारावर गरीब कुटुंबातील तरुणाने सद्गुरुकृपा डेव्हलपरच्या माध्यमातून उद्योजक म्हणून पुणे,सातारा जिल्ह्यात गगनभरारी घेतली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केली.
भोर तालुक्याच्या पूर्वेकडील सारोळा येथे सद्गुरू कृपा डेव्हलपर्स च्या आरएमसी(रेडी मिक्स काँक्रीट)प्लांटचे उद्घाटन प्रसंगी आमदार थोपटे शुक्रवार दि.१ बोलत होते.भोर तालुक्यात आरएमसी प्लांटची गरज आणि सध्याचा काळात काँक्रीट रस्त्याची वाढलेली मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन सद्गुरूकृपा उद्योग समूहाचे चेअरमन नितीन ओहाळ तसेच महेंद्र ओहाळ यांनी प्लांट उभा केला आहे.श्री सदगुरू कृपा हॅाट मिक्स प्लांट आणि दोन वर्षांपूर्वी कान्हवडी येथे श्री सदगुरू कृपा स्टोन क्रशर प्लांट कामातील उत्तम दर्जाच्या जोरावर सुरू आहेत असेही आमदार थोपटे म्हणाले. यावरळ वाई- खंडाळा- महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे जेष्ठ बंधू मिलिंद पाटील, सातारा जि.प.चे माजी अध्यक्ष उदय कबुले,चिक फिडचे मॅनेजर कोंडे, राजेंद्र तांबे, शामराव गाढवे, अतुल पवार, यशवंत चव्हाण, रविंद्र सोनावणे, पोपट मरगजे, सचिन मरगजे, सुजितसिंह शेळके, पै नवनाथ शेंडगे, दयानंद धायगुडे, विशाल धायगुडे, राजेंद्र धायगुडे, सत्यजित धायगुडे, संदिप धायगुडे, भिवराव बोराटे, नागेश ननावरे, संजय ननावरे, रोहन आवारे , संतोष बावकर, प्रविण पवार उपस्थित होते.
COMMENTS