सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कोरोनाची महामारी ओढवली असताना रुग्णांची सेवा करण्याचे काम करीत माणुसकीचे दर्शन देत आशा सेविकांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. कोरोना काळात देवदूत बनून आशा सेविकांनी केलेल्या कामाला सलाम असून त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नेरे ता.भोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवार दि.१ आशा डे च्या निमित्ताने सेविकांच्या सन्मान सोहळ्यात उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी केले.
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम डोंगरी भागातील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा डे निमित्त शुक्रवारी दि.१ उन्नती महिला प्रतिष्ठानतर्फे आशा सेविकांना सन्मानित करुन आशा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी ६ उपकेंद्रातील ४० आशा सेविकांना उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे,अरुणा कुमकर,संध्या झगडे,मनीषा पडवळ, भाग्यश्री वरटे,रेश्मा म्हस्के यांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे, आरोग्य सेविका अश्विनी जगताप ,आशा गटप्रवर्तक,आशा सेविका तसेच नेरे आरोग्य केंद्रातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन संध्या झगडे यांनी केले.
COMMENTS