पुरंदर ! नीरा येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना जामीन मंजूर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
निरा ता. पुरंदर येथील निकिता चैतन्य घुले या २७ वर्षीय विवाहतेच्या आत्महत्या प्रकरणी चैतन्य घुले, पूजा घुले, आरती घुले, सुवर्णा घुले व किशोर घुले  यांचेवर जेजुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.    तेंव्हापासून आरोपी अटकेत होते फिर्यादी यांचे वतीने सरकारी वकील व फिर्यादी यांचे खाजगी वकील यांनी बाजू मांडली. आरोपीच्या वतीने ॲड.पृथ्वीराज चव्हाण यांनी पूजा ,आरती ,सुवर्णा ,किशोर यांचा जामीन अर्ज पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता.
आरोपी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती .एस.बी.राठोड  कोर्ट यांनी ऐकून घेतला. आरोपी यांचे वकील ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यांचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. 
To Top