भोर ! प्रा. डॉ. प्रदिप थोपटे यांना नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पी.एच.डी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
प्रा. डॉ. प्रदीप गोविंदराव थोपटे यांना नांदेडच्या रामानंद तीर्थ मराठवाडा, विद्यापीठा ची पी.एच.डी. प्राप्त झाली असून त्यांनी 'कम्पॅरिटीव्ह स्टडी ऑफ द एटीट्यूड ऑफ लॉ कॉलेज प्रिन्सिपल, प्रोफेसर अँड स्टूडेंट ऑफ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद टूवर्ड्स फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स' या विषयावर जे संशोधन केले त्याबद्दल त्यांना विद्यापीठातर्फे पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ. प्रदिप थोपटे यांना पी. एच.डी.साठी डॉक्टर डी.डी.बच्चेवार यांनी मार्गदर्शन केले.
        विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण आणि खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असून शैक्षणिक संस्था आणि विद्यापिठां चा याविषयी काय दृष्टिकोन आहे, ते हा विषय किती गांभी र्याने घेतात यावर तुलनात्मक अभ्यास करण्याची नितांत गरज असल्यामुळे मी 'कम्पॅरिटीव्ह स्टडी ऑफ द एटीट्यूड ऑफ लॉ कॉलेज प्रिन्सिपल, प्रोफेसर अँड स्टूडेंट ऑफ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद  टूवर्ड्स फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स' हा विषय संशोधनासाठी निवडला होता. हा विषय सर्वच शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणार असून सुचविलेल्या सुधारणा नक्कीच उपयुक्त असल्याचं मत प्रा. डॉ. प्रदीप थोपटे यांनी व्यक्त केले
To Top