Bhor News ! भोरला होणार अनंतनिर्मल शेतकरी कृषी प्रदर्शन : स्वरूपा थोपटेंनी केले माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात प्रथमच तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ आयोजित अनंतनिर्मल शेतकरी कृषी प्रदर्शन (बचत गट व पशुपक्षी प्रदर्शन) १७ ते २१ डिसेंबर होत असून कृषी प्रदर्शन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
     कृषी प्रदर्शनात पाच दिवसांच्या कालावधीत अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान ,कृषी संशोधन, कृषी अवजारे ,ट्रॅक्टर व वाहने यंत्रसामुग्री, ठिबक सिंचन प्रणाली,विविध प्रकारचे खते व बी बीयाने ,पशुसंवर्धन व पशुखाद्य, गृह उपयोगी वस्तू, खाद्य महोत्सव याविषयी माहिती मिळणार असून विशेष आकर्षण महाराष्ट्राची लोकधारा, होम मिनिस्टर ,शालेय नृत्य स्पर्धा व पशुपक्षी प्रदर्शन होणार आहे.तर कमी उंचीची आणि जास्तीत जास्त दूध देणारी पुंगनुरू गाय व ओडिश जातीचा नंदी ठेवण्यात येणार आहे.याची माहिती संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे पत्रकार परिषदेत यांनी दिली.यावेळी उपाध्यक्ष अतुल शेडगे ,युवानेते पृथ्वीराज थोपटे, संपत दरेकर, विजय शिरवले, दिलीप वरे,मधुकर कानडे, नरेश चव्हाण ,अनिता गावडे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
To Top