सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली ता. बारामती येथील श्री हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड झाली. ठरल्याप्रमाणे यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या जागेवर दत्तात्रय गुलाब कदम यांची चेअरमन पदी, तर गणेश दत्तात्रय कांबळे यांची व्हाइस चेअरमन पदी निवड करण्यात आली.
तालुक्यातील तरडोली येथील शेतकऱ्यांच्या हनुमान हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सहकारी संस्थेचे सुमारे ७४८ शेतकरी सभासद आहेत. येथील यापूर्वीच्या चेअरमन शारदा अशोक पवार व व्हाईस चेअरमन दत्तात्रय कृष्णा पुणेकर यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेवर दत्तात्रय गुलाब कदम चेअरमनपदी निवड करण्यात आली.तर व्हाइस चेअरमनपदी गणेश दत्तात्रय कांबळे व प्रदीप धायगुडे हे दोन अर्ज दाखल केले होते. मात्र कांबळे यांच्या बाजुने बहुमताचे पारडे दिसताच धायगुडे यांनी मागार घेतली. यामुळे नाट्यमयरीत्या कांबळे यांचा व्हाइस चेअरमन पदाचा मार्ग निवड निश्चित झाला.
या निवड प्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक किसन दिनकर तांबे, भाजपाचे तालुका पदाधीकारी राजवर्धन भापकर , सामाजिक कार्यकर्ते मंगेश खताळ, सतीश भापकर, दिलीप पवार , भगवान धायगुडे , संपत भोइटे, संतोष चौधरी , सतीश गायकवाड, संस्थेची सचिव गोपीचंद टेकवडे उपस्थित होते. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एम बोबडे यांनी काम पाहिले. निवडीनंतर बोलताना चेअरमन दत्तात्रय कदम यांनी सांगितले की, सर्व सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन खरीप व रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणार आहे तर व्हाइस चेअरमन गणेश कांबळे यांनी सांगीतले की, संस्था अ वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले