सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शळा क्रमांक २ मध्ये सविंधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा क्रमांक १ आणि २ मश्ये सविधान प्रतिमा आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारणीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आली.
येथील प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये सविंधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन येथील सिद्धार्थ तरुण मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तुषार हिरवे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन कवी हनुमंत चांदगुडे उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच अश्विनी सकट, ग्रा. पं. सदस्य विलास वाघचौरे, शंकर शेंडगे, वैष्णवी बारवकर, मयुरी लोणकर, अश्विनी जाधव, निलोफर तांबोळी, नयना जगताप, पुजा निकाळजे आदींचा शाळेच्यावतीने सत्कार तसेच सिद्धार्थ तरुण मंडळाच्यावतीने मान्यवरांना डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले.
कवी हनुमंत चांदगुडे यांनी स्वतःच्या लेखणीतून साकारलेले 'वाच संविधान' या गीतातून संविधानाविषयी सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी ग्रा. पं. सदस्य संजय बारवकर, विलास धेंडे, साधु सकट, शाळा १ च्या मुख्याध्यापिका साधना लोणकर, किशोर धेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर स्वामी, असिफ कोतवाल, फारूक शेख, सलीम इनामदार, दत्ता वाघचौरे, विष्णू वाघचौरे, दिपाली क्षीरसागर, शाहीन काझी, मोनिका धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी सुपे केंद्राच्या केंद्रप्रमुख नंदा धावडे, विस्तार अधिकारी ताम्हाणे साहेब, गटशिक्षण अधिकारी संपत गावडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी अलका माने, शितल कुसाळकर, माया क्षीरसागर आदीचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सुहास माने यांनी केले. तर सुत्रसंचालन उपशिक्षक सचिन लवांडे यांनी केले. ...............................