सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा ( ता.पुरंदर) येथील नदीम रशीदभाई सय्यद
यांची पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक सेलच्या
अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पञ नुकतेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले , राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते खळद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात नदीम सय्यद यांना
देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा मध्य.सह. बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदरचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ , समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, माजी जि.प. सदस्य विराज काकडे, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, ईश्वर बागमार, बाळासाहेब कामथे आदी उपस्थित होते.
नदीम सय्यद यांच्या निवडीबद्दल त्यांचे पुरंदर तालुक्यातील मुस्लिम समाजासह विविध क्षेत्रातील युवक कार्यकर्ते व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
-------------------------------------------------------------