सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भिगवण : प्रतिनिधी एस.एस. पिसाळ
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील पोंधवडी पवारवस्ती येथील विहिरीत चिमुकलीसह उडी घेत विवाहितेने जीवन संपवले आहे. हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत भिगवण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आईचा मृतदेह सापडल्या नंतर १० तासांनी चिमुकलीचा मृतदेह शोधण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार धनश्री केतन मदने वय.३१ रा.पवारवस्ती पोंधवडी असे मयत विवाहितेचे नाव असून परी केतन मदने वय १८ महिने असे चिमुकलीचे नाव आहे.याबाबत विवाहितेचे वडील नामदेव जंगलू कोकरे रा.खातगाव यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली आहे.खबरी नुसार ३० /११/२०२३ रोजी धनश्री घरी कोणालाही न सांगता लहान परीला घेवून निघून गेली होती.तिचा शोध सुरु असताना २/१२/२०२३ जावई केतन मदने यांनी फोन करून धनु पवारांच्या विहिरीत पडली आहे माहिती दिली.यावेळी शोध घेणाऱ्या नातेवाईक यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता अकोले गावच्या हद्दीत अलका शिवाजी पवार यांच्या गट.नं.१३७ मधील विहिरीत धनश्री यांचा मृतदेह आढळून आला.यावेळी धनश्री यांचे कडेला बाळ घेतल्याची स्थितीत मृतदेह आढळून आल्याने चिमुकलीला सोबत घेवून उडी मारल्याची शक्यता गृहीत धरून शोध घेण्यात आला.आईचा मृतदेह सापडल्या नंतर १० तासांच्या अंतराने चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.चिमुकलीचा मृतदेह सापडल्यामुळे पोंधवडी पवारवस्ती आणि अकोले या गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.मयतांचे शव विच्छेदन करण्यात आले असून आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.सदर घटनेचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.
COMMENTS