सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील अधिकारी व कर्मचारी नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना (O P S ) लागू करा या मागणीसाठी आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी. निम सरकारी या सर्व कर्मचाऱ्यांना. अधिकाऱ्यांना नवी पेन्शन योजना (N P S ) रद्द करून जुनी पेन्शन योजना. महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम. 1982. व नियम 1984 अन्वये पुन्हा पूर्ववत लागू करावी या प्रमुख मागणीसाठी. आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून पुकारण्यात आलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी. शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ राहुरी यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद राज्यव्यापी संपामध्ये सहभागी झाले आहेत
COMMENTS