सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता. बारामती येथे चोरट्यांनी गावठी कट्टयाचा धाक दाखवून दोन तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.
आज दि. १८ रोजी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. सविस्तर हकीकत अशी, वाघळवाडी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मागे महादेव लव्हे यांचे घर असून ते सोमेश्वर कारखान्यात कामाला चार वाजता बाहेर पडाले. जाताना घराला बाहेरून कुलूप लावून गेले. ते गेल्यानंतर अवघ्या वीस मिनिटातच घराचे कुलूप तोडून दोन चोरट्याने लव्हे यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याच्या घरात मुलगा अनिकेत, पत्नी नीना व आई होते. चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सगळे खडबडून जागे झाले. त्यातील एका चोरट्याने अनिकेत याला गावठी कट्टयाचा धाक दाखवून खाली बसण्यास सांगितले. असे अनिकेत लव्हे याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
महादेव लव्हे व नीना लव्हे हे दोघे शिरूर येथे लग्नाला जाऊन आल्यानंतर पत्नी नीना यांच्या अंगावर दोन तोळ्यांचे गंठण तसेच होते. नीना यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण हिसकवून चोरटे काही मिनिटांतच पसार झाले.
COMMENTS