सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील नींबूत गावामध्ये काल रात्री चोरट्यांनी सात ते आठ बंद असलेल्या घरांचा कुलपे तोडून कडी कोंयडा उचकटुन मिळेल तो ऐवज चोरून नेला आहे.
रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान नींबूत गावांमधील गोसावी वस्ती, रामोशी वस्ती, मुस्लिम अळी व मुस्लिम लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या मशिदीमध्ये चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. या गावातील जवळजवळ सात ते आठ बंद असलेल्या घरांची कुलूपे तोडून शेजारील घरांच्या कड्या लावून पहाटेच्या सुमारास चोरी झाली आहे. सत्तार अब्दुल शेख, किरण जगताप, शहाजी जगताप , सुरज जाधव, दादा जाधव व इतर दोन जणांच्या घरातील ऐवज चोरीला गेला आहे.
करंजे पूल पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल झाली असून पुढील तपास करंजेपूल पोलीस करत आहेत