सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Baramati News ! दिपक जाधव ! 'जनाई'चा पाणी प्रश्न पेटला, खासदारांच्या समोर मांडला समस्यांचा पाढा : तोडगा न निघाल्यास २६ जानेवारीला उपोषण

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे परगण्याला जीवदान देणारी जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काचा पाणी प्रश्न पेटला आहे. या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर शेतकऱ्यांनी जनाई योजनेतील तृटींचा पाढा वाचला. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास येत्या २६ जानेवारीला आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. 
         सुपे येथील माऊली मंदिरात जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काच्या पाणी प्रश्नासंबंधीची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने पाण्याचे एक वर्षाचे नियोजन करुन तीन टप्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच या योजनेद्वारे गेल्या ३० वर्षात २० टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. ही योजना सुरु झाल्यापासुन आंबी, चांदगुडेवाडीचा काही भाग, शेरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी आणि जळगाव सुपे आदी गावांचा बहुतांश शिवार ओलिताखाली आलेला नाही. त्यामुळे आमच्या हक्काचे २ हजार १७० एमसीएफटी पाण्याचे तीन टप्यात वाटप करावे. तसेच पावसाळ्यात नद्यांना ओव्हर फ्लो होणारे पाणी लाभधारक शेतकऱ्याना मिळावे. येथे जलसंपदाचे ऑफिस व्हावे अशा एकुण प्रमुख १२ मागण्याचे निवेदन खासदार सुळे यांच्याकडे देण्यात आले. 
       यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, ॲड. दत्तायय बोरकर, ज्ञानेश्वर कौले, महादेव भोंडवे, कालिदास भोंडवे आदींनी जनाई मध्ये असलेल्या तृटींबाबत सवुस्तर माहिती दिली. यावेळी शिरसाई उपसा योजनेचे उपोषणकर्ते व माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी जलसंपदा आणि महापालिका यांच्याविरोधात उच्च न्यायालयात हक्काच्या पाण्याबाबत दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. 
       दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी अतुल कपोले यांच्याशी फोन द्वारे माहिती दिली. यावेळी जनाईचा प्रश्न त्वरित सोडवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी कपोले यांनी येत्या २३ जानेवारी पर्यत शेतकऱ्यांची बैठक घेवु. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न करु असे सुळे यांना  सांगितले. 
       मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक होवुन जलसंपदा अधिकाऱ्यांनी सुप्यात येवुन आमचे प्रश्न मार्गी लावावेत यावर शेतकरी ठाम आहेत. तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी पासुन हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे पत्र सुळे यांना यावेळी देण्यात आले. 
       ................................... 
     

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7305,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : Baramati News ! दिपक जाधव ! 'जनाई'चा पाणी प्रश्न पेटला, खासदारांच्या समोर मांडला समस्यांचा पाढा : तोडगा न निघाल्यास २६ जानेवारीला उपोषण
Baramati News ! दिपक जाधव ! 'जनाई'चा पाणी प्रश्न पेटला, खासदारांच्या समोर मांडला समस्यांचा पाढा : तोडगा न निघाल्यास २६ जानेवारीला उपोषण
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjrULF6N-GS7ludOaVrRw7M0uJWgFPmUGtOCg1NKoivGaULHq-fARq-k9vVYvDXk_b5PZ5uZbtZg-ec1lAfkFPQneUnxSMwJZs7dHlzT7rp0AjkNu6BqB6XyFKKL92SZ-vFMLNy79Tb1vDNCdsy-XJq12SPAzOCqNkzlRqI0bmqwL8lu73f709kFX4zOiWk
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjrULF6N-GS7ludOaVrRw7M0uJWgFPmUGtOCg1NKoivGaULHq-fARq-k9vVYvDXk_b5PZ5uZbtZg-ec1lAfkFPQneUnxSMwJZs7dHlzT7rp0AjkNu6BqB6XyFKKL92SZ-vFMLNy79Tb1vDNCdsy-XJq12SPAzOCqNkzlRqI0bmqwL8lu73f709kFX4zOiWk=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2024/01/baramati-news_17.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2024/01/baramati-news_17.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy