सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सातारा : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्यभर सातत्यानं विविध उपक्रम, कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमात अँकरिंग करण्यासाठी बऱ्याचा बाहेरचे, कमर्शियल निवेदक बोलावले जातात.. या अँकरला संस्थेची माहिती नसते, पदाधिकाऱ्यांची नावं माहिती नसतात, जे लिहून दिलंय तेवढंच हे अँकर्स बोलत असतात.. त्यातून गोंधळ आणि विनोद निर्माण होतात.. यापुढे परिषदेच्या कार्यक्रमासाठी बाहेरचे अँकर बोलवायचे नाहीत असा निर्णय परिषदेनं घेतला आहे.. परिषदेकडे चांगले अँकर्स आहेत, चांगले वक्ते आहेत.. परिषद त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.. परिषदेच्या सदस्यांमधून अँकर्सची एक टीम करण्यात येणार आहे.. या टीममधील अँकरला विविध कार्यक्रमात आलटून पालटून संधी दिली जाणार आहे.. आपल्या मधील टँलेन्ट ला जगासमोर आणण्याचा परिषद यातून प्रयत्न करणार आहे.. या टीमसाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अँकर्स निवडले जाणार आहेत.. चांगल्या नावांची शिफारस केल्यास त्याचे स्वागत आहे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले आहे