सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
हा ऊस माझा आहे, कारखान्याला जाऊ देणार नाही असे म्हणत मुरूम ता. बारामती येथे एकावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला आहे.
याबाबत निलेश नंदकुमार शिंदे रा मुरुम ता. बारामती यांनी दिल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विक्रम विठ्ठल जाधव व कलावती विठ्ठल जाधव रा मुरुम ता बारामती जि पुणे यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता निलेश शिंदे हे उसाला तोड आल्याने ऊसतोडणी कामगारांना उसाचा फड दाखवायला गेले असता आरोपी यांने हा ऊस माझा आहे मी तोडु देणार नाही व कारखान्याला जाऊ देऩार नाही हा ऊस आमच्या नावावर पाठवायचा आहे असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाऴ दमदाटी करुन तुला आज जिवंत ठेवणार नाही असे म्हणुन विक्रम जाधव याने त्यांच्या हातातील कोयता फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला व शेजारील बोटाच्या मध्यभागी मारुन तसेच डोक्यात व हनुवटिवर कोयता मारुन दुखापत केली आहे.
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.