Baramati Breaking ! दंडवाडीत युवकाची पेटवुन घेवुन आत्महत्या : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांना अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील कोळोली गावच्या हद्दीतील सोनपीरवाडी ते काऱ्हाटी रस्त्यावरील एका प्लॉटींगमध्ये दंडवाडी येथील एका युवकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन घेतले. या प्रकरणाचा तपास केला असता एक चिठ्ठी सापडुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी ( दि. २१ ) रात्री चार जणांना अटक करण्यात आली आहे. 
        विक्रम दिलीप चांदगुडे ( वय ३०, रा. दंडवाडी, ता. बारामती ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 
         पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील कोळोली गावच्या हद्दीतील सोनपीरवाडी ते काऱ्हाटी रस्त्यावरील एका प्लॉटींगमध्ये दंडवाडी येथील एका युवकाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळुन घेतले. यावेळी त्यास लागलीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ५५ टक्क्याच्या पुढे जळाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन दिवसाने त्यांच्या स्विप्ट ( क्र. एम एच ४२ बी. बी. ३०५५ ) या गाडीत गियर बॉक्स जवळील कप्यात एक कागदाची चिट्ठी आढळुन आली. 
       त्यामध्ये चिठ्ठीत इंग्रजीत गोळया औषधाची नावे लिहली होती. त्याचे खाली मराठीत 'मागे पहा महत्वाचे आहे' असे लिहीलेले होते. सदर चिठ्ठीच्या पाठीमागे पाहणी केली असता माझी काही चुक नसताना रामभाऊ चांदगुडे, शांताराम राजाराम चांदगुडे, संजय किसन चांदगुडे, वसंत गणपत चांदगुडे ( सर्व रा. दंडवाडी, ता. बारामती) आदींनी माझी बदानामी केली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. या संदर्भातील फिर्याद तुषार दिलीप चांदगुडे ( वय ३२ धंदा शेती, रा. दंडवाडी ता. बारामती ) यांनी पोलिस स्टेशनला दिली. 
         त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वरील चारही जणांना रविवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. तर सोमवारी ( दि. २२ ) न्यायालयाकडुन आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती. तर आज ( मंगळवारी ) न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक तपास सुप्याचे सपोनी नागनाथ पाटील करीत आहेत.
         .............................
To Top