Baramati News ! राज्यस्तरीय नृत्यमल्हार स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानची दोन मुले चमकली : अथर्व गरुड व स्वानंदी जाधव यांचा प्रथम क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे येथे आयोजित केलेल्या नृत्यमल्हार स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान सोमेश्वरनगर येथील मध्यम गटात अथर्व गरुड तर लहान गटात स्वानंदी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
       पुणे येथे दि. १९ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सलग तीन सुरु असलेली आतंरशालेय राज्यस्तरीय नृत्यमल्हार स्पर्धेत विद्याप्रतिष्ठान शाळेत शिकत असलेला मुरुम गावचा अथर्व गरुड याने चारशे विद्यार्थामध्ये पाचवी ते सातवी या गटात प्रथम विजेता ठरला. तसेच बेस्ट डान्सर विनर सुद्धा ठरला. पहिली ते चौथी या गटात वाणेवाडीची स्वानंदी जाधव हिने लहागटात प्रथम क्रमांक मिळवला  मिळवला. 
       विश्वज्योत इंटरनॅशल CBSC स्कुलमध्ये शिकत असलेली भक्ती पटेल हिने प्रथम क्रमांक मिळ‌ला .जीया पटेल हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. YN डान्स अॅकॅडमी हि  बारामती मधील वाघळवाडी-सोरेश्वरनगर या ग्रामिण भागातील असुन याचे नृत्यदिग्दर्शक योगेश ननवरे हे कलाक्षेञामध्ये गावाकडच्या मुलांना चांगल्या स्टेजपर्यत पोहचवणे हा उद्देश आहे. नृत्यदिग्दर्शक योगेश ननवरे सराचे मार्गदर्शन व ट्रेनिंग या मुलांना मिळाले असुन पुढिल स्पर्धेसाठी तयारी सुरु आहे.
To Top