Baramati Breaking ! दीपक जाधव ! 'जनाई' च्या लढ्याला यश.. मागण्या मान्य..उपोषण सोडणार : आजच्या मंत्रालयातील बैठकीला यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी शिष्टमंडळ आणि जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुंबई मंत्रालयात मंगळवारी (दि. ३०) बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकित शासनाने शेतकरी शिष्टमंडळाच्या १२ मागण्या मान्य केल्याने एकत्रित दिलेल्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे उद्या ( बुधवारी ) शासकिय अधिकाऱ्यांचे अधिकृत पत्र मिळाल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते पोपट खैरे यांनी दिली. 
      जनाई उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी सुपे (ता. बारामती) येथे गेली पाच दिवसापासुन बेमुदत सुरु असलेले उपोषण बुधवारी       ( दि. ०१ ) अधिकृत सुटणार आहे. जनाई योजनेचे लाभधारक शेतकऱ्यांसह परिसरातील गावांचे आज (मंगळवारी ) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शेतकरी संघर्ष कृती समितीचे शिष्टमंडळातील ज्ञानेश्वर कृष्णाजी कौले, राजेंद्र हरिभाऊ बोरकर, विजयराव गोविंदराव खैरे, महेश शंकर गायकवाड, प्रकाश सूर्यकांत काळखैरे, त्रिंबक भिकोबा चांदगुडे, संजय मारुती काकडे, काशिनाथ व्युहभेद कुतवळ, गणेश बाळासो भोंडवे, दिलीप शंकर खैरे, अमोल शिवाजी वाबळे, दत्तात्रय शिवाजी पानसरे, आणि योजनेचे संबंधित अधिकारी आदींची मंत्रालयात दुपारी ३ वाजता बैठक झाली. 
      या बैठकिला जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी अतुल कपोले, दिगंबर दुगल, कपुर, गुनाले,  जनाईचे कार्यकारी अभियंता महेश कानिटकर, खडकवासला पाठबंधारे विभागाच्या श्वेता कुऱ्हाडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने दिलीप खैरे यांनी १२ मागण्या बैठकीत मांडल्या. त्यातुन मार्ग काढण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला केल्या.  यावेळी समितीने मांडण्यात आलेल्या १२ मागण्या जलसंपदा खात्याने मान्य केल्याने या एकत्रित लढ्याला यश आले. 
      दुपारी झालेली मंत्रालयातील बैठकीतील सकारात्मक माहिती मिळताच सुप्यात शेतकऱ्यांच्यावतीने फटाके फोडुन आनंद व्यक्त केला. 
       बुधवारी ( दि. ०१ ) शासनाच्यावतीने अधिकृत पत्र मिळाल्यावर उपोषण सोडणार असल्याचे उपोषणकर्ते पोपट खैरे, भानुदास बोरकर आणि सचिन साळुंके यांनी सांगितले. 
        .........................

To Top