सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे.
बारामती तालुक्यातील चौधरवाडी गावालगत वनविभाग हद्दीमध्ये कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका करून वनविभागाच्या ताब्यात हरणाला देण्यात आले.
सद्य:स्थितीतील तीव्र दुष्काळांमुळे ग्रामीण भागातील वन्यप्राण्यांची जिवाची काहिली होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी भटकंती करूनही पुरेसा चारा व पाणी मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाल्याने पाण्यावाचून वन्यप्राण्यांची घालमेल होत आहे. मंगळवार दि .३० रोजी सायंकाळी सहा वाजता चौधरवाडी परिसरात पाणी चाऱ्यासाठी भटकंती करताना एक हरिण भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. परंतु गुळूंचे गावातील दिपक जाधव, निखिल खोमणे या तरुणांना हे दिसताच त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्या हरणाची सुटका केली. याबाबत वनविभाग अधिकारी नवनाथ रासकर आणि रेस्क्यू टीम यांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
युवकांच्या धाडसीने हरणाला जीवदान मिळाल्याने गावकऱ्यांकडून युवकांचे कौतुक केले जात आहे.