सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
गाळमाती उपसण्याचे कारणावरून फिर्यादी प्रकाश भगत व त्यांचे आई वडीलांस बेदम मारहान करणाऱ्या एकुन १३ आरोपीस पाच महिण्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येक आरोपीस १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील कानाडवाडी गावचे हददीत दि.२० एप्रिल २०१२ रोजी फिर्यादी प्रकाश तुळशीराम भगत व त्यांचे आई-वडील व इतर जखमी साक्षिदार यांना गाळमाती उपसण्याच्या कारणावरून आरोपी दिगंबर गुलाब मासाळ, शरद गुलाब मासाळ, पिंटू उर्फ प्रेमचंद दिगंबर मासाळ, वैभव शरद मासाळ, कुंडलिक बापु माने (मयत), जालिंदर कुंडलिक माने, गेमा बापु माने, दत्तात्रय संपत पडळकर, मंगल दिगंबर मासाळ, आनंदी शरद मासाळ, राणी जालिंदर माने, छबुताई कुंडलिक माने, कमल बबन माने, रतन संपत पडळकर वरिल सर्व रा. मोराळवाडी ता. बारामती जि पुणे यांनी आपापसात संगणमत करून, बेकायदा गर्दी जमाव जमवुन हातात लोखंडी पाईप, दांडके, काठ्या, व केबल वायर अशी हत्यारे घेवुन वरिल लोकांना डोक्यात मारहान करून गंभीर दुखापत केली आहे म्हणुन वरिल १४ आरोपीविरूध्द वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक जी.बी. पांढरे यांनी तपास पूर्ण करून बारामती कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर गुन्हयात आरोपीं विरूध्द गुन्हा शाबीत करणेसाठी सरकारी वकील नितीन प्रकाश होळकुदे यांनी एकुन आठ साक्षिदार तपासले व सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे दाखल करून वरिल सर्व १३ आरोपींविरूध्द सबळ व भरपुर पुरावा असल्याने अंतिम युक्तीवाद करून सर्व आरोपीस प्रत्येकी ५ महिन्याचा कारावासाची शिक्षा व प्रत्येक आरोपीस १० हजार रुपये दंड केला आहे. वरिल सर्व १३ आरोपीस सदर शिक्षा ही बारामती येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. ए. आपटे यांनी सुनावली असुन, सरकारी वकील नितीन प्रकाश होळकुदे, यांना सदर केस कामी कोर्ट पैरवी म्हणुन महीला पोलीस शिपाई एम. के. भोईटे यांनी सहकार्य केले आहे.