सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील नांदगाव ता. भोर येथील खडीक्रेशरच्या वारंवार होणाऱ्या ब्लास्टमुळे गावातील घरांना हादरे बसत होते. मात्र बुधवार दि.३ जानेवारी दुपारी भयंकर मोठ्या प्रमाणात झालेल्या ब्लास्टमुळे घराची भिंतच कोसळली यात स्थानिक विष्णू हरिभाऊ कुडले (नांदगाव ता.भोर) यांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले असून नशीब बलवत्तर म्हणून लहान मुले तसेच महिला घरातून बाहेर पळाल्याने अनर्थ टळला.
नांदगाव येथील खडीक्रेशरचा नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे तर वारंवार अनेकांच्या घराला तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत. काहींच्या घरांच्या भिंती भेगालल्याने घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत. प्रशासनाला वारंवार याविषयी सांगूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.जीव मुठीत धरून आम्हाला घरात राहावे लागते.शासनाने खडी क्रेशरवर कारवाई करावी असे स्थानिक ग्रामस्थ तसेच विष्णू कुडले यांनी सांगितले.
COMMENTS