पुरंदर ! शेतीला अन्न धान्यसोबत ऊर्जा निर्मितीचे साधन बनवले तर मोठी क्रांती घडू शकते : अजित फटाके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
आजच्या घडीला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांची कृषी विषयक धोरणे शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेच्या विरोधात आहेत. शेतीला अन्न धान्यसोबत ऊर्जा निर्मितीचे साधन बनवले तर मोठी क्रांती घडू शकते. असे मत आम आदमी पार्टीचे संघटक अजित फटाके यांनी मांडले. 
          पुरंदर तालुक्यातील निरा-शिवतक्रार याठिकाणी ते बोलत होते. यावेळी अमोल देवकाते, आपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव, दौंड चे तालुकाध्यक्ष, इंदापूरचे आण्णासाहेब पाटील, अरविंद बनसोडे बारामती, महेश जेधे, विजय धायगुडे,शहाजी कोलते, राजन पवार, संदीप चौडकर उपस्थिती होते. फटाके पुढे म्हणाले, इथेनॉल हे खनिज तेलाला पर्याय आहे तर सौर ऊर्जा दगडी कोळशाला. साखर कारखान्याची जर 25 की मीची अट रद्द केली तर कारखान्याच्या स्पर्धेत उसाला चांगला दर मिळेल आणि देशाची इथेनॉल निर्मिती क्षमता देखील वाढेल.
इथेनॉल निर्मिती वर असणारे निर्बंध पूर्णपणे हटविण्यात यावे. पूर्णपणे इथेनॉल वर चालणाऱ्या वाहणाच्या निर्मितीस परवानगी द्यावी तसेच शासन धोरणात प्रोत्साहन देण्यात यावे. शेतकऱ्यांना इथेनॉल पंप टाकण्याची परवानगी द्यावी. कांदा, कापूस तत्सम प्रकारच्या पिकावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी हटविण्यात यावी. शेतजमिनीवरील सोलर प्रकल्पात जमीनधारक शेतकऱ्यांस भागधारक बनविणे बंधनकारक करणे, अशी फाटके यांनी मांडली.
     तर घटनेने देशातील सर्व जनतेला स्वातंत्र्य, समता,न्याय, बंधुता,  हे अधिकार दिले आहेत, पण सरकार निवडणूक जिंकण्यासाठी, सत्तेसाठी मोठया प्रमाणात असलेल्या ग्राहकांचा विचार करून ग्रामीण भागात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्यात बंदी करून बाजारभाव पाडत आहेत, आणि शेतकऱ्यांना घटनेने दिलेले अधिकारावर गदा आणत आहेत, पण शेतकरी गुलामीचे जीवन न जगता स्वातंत्र्य झाला पाहिजे अशी परखड भूमिका दत्तात्रय कड तालुकाध्यक्ष आप पुरंदर यांनी मांडली 

To Top