पुरंदर ! विजय लकडे ! निरा येथील दिग्गज साहित्यिकांची परंपरा जपतोय युवा लेखक : सहा वर्षात तब्बल ४० पुस्तके प्रकाशित

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा येथे साहित्यिक व लेखक प्रगल्भ विचारसरणीचे आहेत यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते प्रा. व. बा. बोधे  व डॉ. दिनकर गायकवाड यांचे परंतु यामध्ये आता एका नव्या दमाच्या साहित्यिकाची भर पडली आहे. या नवीन लेखक साहित्यिकाचे नाव सुनील पांडे असे आहे. 
      सुनील पांडे हे सध्या पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहेत यांचे शिक्षण एम ए मराठी झाले आहे. पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण निरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व महात्मा गांधी विद्यालय निरा येथे झाले आहे. .
    २०१८ साली नीरा एक सुंदर गाव (चारोळी संग्रह ) प्रकाशित झाले त्यानंतर आज पर्यंत अनेक पुस्तके प्रकाशित झाली. २०२३ साली प्रकाशित झालेले नादिष्ट. (ललित लेख संग्रह ) हे प्रकाशित झाले. आत्तापर्यंत डायरी एका प्रेमाची, गोष्ट एका रिटायरमेंटची, लॉटरी, बेस्ट फ्रेंड, लॉक डाऊन चे दिवस अशी एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. व आणखी काही पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावरती आहेत. 
     आपल्या शास्त्रामध्ये नर्मदा नदीची परिक्रमा सांगितली जाते परंतु या अवलियाने १२ जानेवारी २०१६ ते २० मे २०१६ या कालावधीत गावातील नीरा नदीची पाचशे किलोमीटर परिक्रमा चालत पूर्ण केली व तीरे तीरे निरा हे परिक्रमेवरील पुस्तक लिहिले व पुढे जाऊन नीरा नदीवरील सात उपनद्यांचा उगम स्थानाचा प्रवास करून त्यावर अमृतवाहिनी नीरा. हे पुस्तक लिहिले. मराठी साहित्यातील तसेच भारतीय आणि जागतिक भाषेतील पहिली व्हाट्सअप महा कादंबरी इंद्रायणी एक्सप्रेस ‌ लिहिली आहे. 
        हा युवा अवलिया साहित्यिक सामाजिक कार्यातही अग्रेसर असून वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विविध शाळा महाविद्यालयात जाऊन ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन सामाजिक भान जपत विविध प्रश्नांवर विविध वर्तमानपत्रातून लेखन करत आहे. या साहित्यिकाच्या अनेक विनोदी कथांना सन्मानचिन्ह व बक्षीस मिळाले असून विनोदी साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल एका दैनिकातर्फे तर्फे गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे.  
 
To Top