सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते राज्यातील 'सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक' हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
मांजरी-पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सभा आज खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, दिलीप देशमुख, विश्वजित कदम, पी.आर. पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, संजय खताळ आदी उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार राजेंद्र यादव व मनीषा यादव या उभयतांनी स्वीकारला. यादव यांनी छत्रपती, अकलूज, रयत अशा साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. सोमेश्वर कारखान्यात 2017 पासून सोमेश्वर कारखान्यात कारकिर्दीतली सर्वोत्तम सेवा केली.
पुरस्कार प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, बाळासाहेब कामथे लक्ष्मण गोफणे, किसन तांबे, जितेंद्र निगडे, तुषार माहूरकर, रणजित मोरे, हरिभाऊ भोंडवे, कमल पवार, कालिदास निकम, दत्ता माळशिकारे आदी मान्यवर उपस्थित होते.