सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या ९० व्या वाढदिनी भोर तालुक्यातील बुजुर्ग तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा प्रत्यक्ष भेटून वर्षाव करीत शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राजकीय कार्यकाळात काँग्रेस पक्षाशी कायमच एकनिष्ठ राहून ६ वेळा आमदार तर १३ वर्ष परिवहन, शिक्षण, कृषी ,मदत व पुनर्वसन, सहकार अशा विविध खात्यांचे मंत्री व राज्य कृषी सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनंतराव थोपटे यांनी काम पाहिले आहे.त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या पद्धतीने मात्र भोर तालुक्याच्या तमाम जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव करीत साजरा झाला.वाढदिवसाचे औचित्य साधून अनंतराव थोपटे महाविद्यालय, राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस धांगवडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात फार्मसी कॉलेज, महाविद्यालय,कॅम्पसचे शिक्षक वृंद विद्यार्थी तसेच राजगड कारखान्याच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान समजून रक्तदान केले.
फोटो - माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना वाढदिनी रक्तदान शिबिराचा फोटो पाठवत आहे.
संतोष म्हस्के
COMMENTS