सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषि गायकवाड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या संचालक पदाची संधी दिली. त्यांनी आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारा कार्य-अहवाल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
या कार्य-अहवालामध्ये त्यांनी कारखाना परिक्षेत्रामधे केलेली विविध कामे नमूद केली आहेत. ऊस जळीत शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भातील केलेली मदत असेल, सोमेश्वर देवराईची निर्मिती असेल, तसेच आपल्या सहकारी क्षेत्राचा कणा असणाऱ्या सभासदांचे प्रश्न समजाऊन घेणेसाठी केलेल्या गावभेटी असतील, सर्वांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये उभा केलेली मदत आणि सहकारी कारखानदारीचा कानाकोपरा माहिती करून घेण्याकरिता विविध अधिकारी व परिषदांद्वारे केलेले प्रयत्न इत्यादी बाबींचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. हा अहवाल प्रकाशित करण्याचा मूळ हेतू हा, आपले सुरू असलेले काम आपल्या मार्गदर्शकांकडे, तसेच आपल्या सर्वांपर्यंत पोहचावे व आपल्या सर्वांच्या सोबतीने पुढील वाटचालीची दिशा अधोरेखित करणे असा आहे.
हा अहवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादांच्या हस्ते प्रकाशित केला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक लक्ष्मण गोफणे, किसन तांबे, ऋषि गायकवाड उपस्थित होते.