सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावरील सोमेश्वर वाहतूक संघटनेने वाहतूकदार मालकांच्या पत्नींना २९ लाख रुपये किंमतीच्या पैठणी वाटप करत त्यांचा सन्मान केला.
सोमेश्वर कारखान्यावर २००७ साली ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून संघटनेने आतापर्यंत विविध सामाजिक कामात योगदान दिले आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत, कोविड काळात कोविड सेंटरला मदत तसेच तसेच ट्रक ट्रॅकर चालकांचा अपघात झाला तर दवाखान्याच्या मदत केलेली आहे. दरवर्षी ट्रक ट्रॅकर मालकाकडून येणारी वर्गणी व संघटनेच्या काही ठेवींवरील व्याजातून या पैठणी वाटप करण्यात आल्या आहेत. यापूर्वी २०१९ साली आठ लाखांची ब्लॅंकेट वाटप, २०२० साली ११ लाखांच्या सतरंज्या वाटप, २०२१ साली चालक लोकांना तीन लाख रुपयांची जर्कींग वाटप तर यावर्षी ३६० महिलांना तब्बल २९ लाखांच्या पैठणी वाटप केल्या आहेत.
नुकताच हा कार्यक्रम पार पडला. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व रोहिणी जगताप तसेच वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे व स्मिता काकडे यांच्या हस्ते ३६० महिलांना पैठणी साडीचे वाटप करण्यात आले. यावेळी सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, संचालक ऋषीकेश गायकवाड, मा. संचालक विजय थोपटे, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सतीश काकडे, सचिन टेकवडे, निलेश ताम्हाणे, विठ्ठल भगत, कैलास मगर, संदीप साळुंखे, दत्तात्रय सोरटे, जालिंदर सावंत, नितीन जगताप, राजेंद्र जगताप, सागर वायाळ, सागर गायकवाड, मनोज होळकर, दादा खोमणे व माऊली शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले तर आभार प्रभाकर जगताप यांनी मानले.
COMMENTS