सॅल्युट..! विजय लकडे ! दोन दिवसात सात किल्ले सर करत राजमाता जिजाऊंना मानवंदना : 'आम्ही भटके आडवाटेचे' आणि 'टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्स'च्या गिर्यारहकांची कामगिरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : विजय लकडे
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले रांगणा, भुदरगड, पारगड, कलानिधीगड, गंधर्वगड आणि सामानगड हे सहा गड किल्ले दोन दिवसात सर करीत "आम्ही भटके आडवाटेचे" आणि टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारहकांनी राजमाता जिजाऊ साहेबांना वंदन केले आणि मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या गड संवर्धन कार्यास समर्पित केली.
             या मोहिमेची सुरवात भटवाडी, ता.भुदरगड, जि.कोल्हापूर येथुन झाली. येथुन किल्ले रांगणाच्या नजिक असलेल्या चिकेवाडी येथे पोहोचायला तब्बल ७ किलोमिटरची पायपीट करावी लागली. येथुन गडावरील ऐतेहासिक वास्तु, महादरवाजा, तलाव, मंदिरे, बुरुज यांना भेट देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चिकेवाडी येथे येऊन परतीची ७ किलोमिटरची पायपीट करण्यात आली. किल्ले रांगणा वरील तब्बल २२ किलोमिटरची भटकंती गडाचे रांगडे रूप दर्शविणारी होती. त्यानंतर भुदरगडावर जाऊन तेथील गडावरील वास्तुंना भेट देण्यात आली. त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा पारगडावर करण्यात आला.

सुर्योदयानंतर पारगड भटकंती करण्यात आली. त्यानंतर कलानिधीगड हा गिरीदुर्ग सर करण्यात आला. येथे दुर्ग संवर्धनाचे कार्य करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या संदिप गावडे, बाबु हनमशेठ यांनी गड संवर्धन बाबत माहिती दिली. या अभ्यासपुर्ण भटकंती मध्ये नुकत्याच प्रकाश झोतात आलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांनाही बाबु झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट देण्यात आली. गडउतार होऊन गंधर्वगड व सामानगड यांना भेट दिल्यावर पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला.

या मोहिमेत 'घाट वाटा', 'सह्याद्रीतील घाट वाटा',  'भटकंती गड-दुर्गांची',  'भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची' चे लेखक सुशील दुधाणे, गजानन डोईफोडे, रविंद्र गाडे, अनिल भागवत (वय ७२ वर्षे), तानाजी राजगुडे, रविंद्र गाढवे, संतोष सोनवणे, प्रेमकुमार तळेकर, डॉ.अजय इंगळे, सोपान तुपे, अनिल भोंगळे, शिवाजी परीट, बाबाजी शेटे, दिलीप बुचुडे, अमोल पन्हाळकर, तनिष्क पन्हाळकर आणि डॉ.समीर भिसे सहभागी झाले होते.
To Top