केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारात बारामतीचा देशात डंका : पहिल्या २० स्वच्छ शहरात बारामतीचा समावेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये बारामतीने  देशपातळीवर मजल मारली आहे. यंदा बारामतीने स्वच्छतेच्या अचूक नियोजनाच्या बळावर देशात १८ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे देशातील पहिल्या २० स्वच्छ शहरांमध्ये येण्याचा शिरपेचाचा सन्मान बारामतीकरांना मिळाला आहे.

मध्य प्रदेशला मागे टाकत यंदा महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळविला. त्यात अपेक्षेप्रमाणे लोकसंख्यानिहाय एक ते तीन लाखांच्या दरम्यान देशातील २०

शहरांत बारामती हे एकमेव शहर ठरले आहे, हे विशेष. लोकसंख्येचा विचार करता बारामती देशात प्रथम क्रमांकावर आहे, असे नमूद केले तरी चुकीचे ठरणार नाही. बारामतीने या स्पर्धेत ७९६८ गुण प्राप्त केले आहेत. यंदा देशात प्रथम आलेल्या इंदूर शहराने ९३४८ गुण मिळविले आहेत. इंदूरची लोकसंख्या २० लाखांपेत्रा अधिक आहे. बारामतीची लोकसंख्या १ लाख आठ हजार इतकी आहे. देशातील पहिल्या २० स्वच्छ शहरांमध्ये समावेश झाल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला
To Top