पुरंदर ! लहुजी शक्ती सेनेच्या पुरंदर तालुका युवकच्या अध्यक्षपदी प्रशांत पाटोळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे..
 लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष व मातंग समाजाचे नेते विष्णू भाऊ कसबे यांनी आज पुणे जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेच्या काही नियुक्त्या जाहीर केल्या.  
           ‌ संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार तसेच प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे. जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सचिव दत्ता जगताप.  जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश भिसे यांच्या सहमतीने लहुजी शक्ती सेना राज्यव्यापी संघटनेच्या पुरंदर तालुक्यातील काही नियुक्ती जाहीर करण्यात आल्या. 
  लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा संपर्क कार्यालय कदम वस्ती ता. हवेली या ठिकाणी पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट. सरचिटणीस आकाश म्हात्रे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.  
 यामध्ये पुरंदर तालुका वरिष्ठ उपाध्यक्षपदी दादा बापूराव रणदिवे यांची तर पुरंदर तालुक्याच्या अध्यक्षपदी निरा येथील प्रशांत पाटोळे व उपाध्यक्षपदी अक्षय खुडे यांची निवड करण्यात आली. 
  यावेळी जनार्दन जोखदंड  अविनाश भिसे  समाज बांधव. व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top