सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील उद्योजक राजेंद्र तुकाराम जगताप यांची बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या औद्योगिक सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते उद्योजक राजेंद्र जगताप यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
त्याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जगन्नाथ शेवाळे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अॅड. एस. एन.जगताप वनिता बनकर, संदीप गुजर, ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, प्रशांत बोरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
राजेंद्र जगताप यांचा सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा इ. क्षेत्रात सक्रिय सहभाग असतो. तरुणांना विविध व्यवसाय व उद्योगा संदर्भात मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते. तसेच गाव पातळीवरील विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. औद्योगिक क्षेत्रातील ट्रांसफार्मर रिपेअर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्यव्यापी संघटनेचे उपाध्यक्षपदी ते भूषवतात. अॅन्थर प्रीमियर इंटरनॅशनल क्लब पुणे(बारामती) चे ते उपाध्यक्ष आहेत.
COMMENTS