Baramati News ! कारखान्यातील प्रत्येक घटकाच्या 'टीमवर्क' मुळे 'सोमेश्वर'चा राज्यात नावकौकीक : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्यातील प्रत्येक घटक टीम वर्क म्हणून काम करत असतो. याच प्रत्येक घटकाच्या टीम वर्क मुळे सोमेश्वर कारखान्याचा राज्यात नावलौकिक असल्याचे मत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.  
           सोमेश्वरनगर ता. बारामती येथे तिळगुळ समारंभ व राजेंद्र यादव यांना व्हीएसआयचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाळ्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात जगताप बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, संचालक विश्वास जगताप, शिवाजीराजे निंबाळकर, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, प्रवीण कांबळे, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, अनंत तांबे, तुषार माहूरकर, सचिव कालिदास निकम, चीफ अकाऊंटंट योगीराज नांदखीले,  शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सतिश काकडे,  कामगार नेते तुकाराम जगताप, बाळासाहेब काकडे, सर्व अधिकारी व कामगार उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जगताप पुढे म्हणाले, सोमेश्वर ने आतापर्यंत ७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. हे करत असताना जिल्हयात ११. २६ चा उच्चांकी गाळप उतारा ठेवला आहे. निम्मा हंगाम पार पडला असून अजून साडेसात ते आठ लाख टन ऊस शिल्लक आहे. पाण्याची कमतरता असलेल्या भागातून सभासदांची शिष्टमंडळे ऊस घेऊन जाण्याची विनंती करत आहे. मात्र हंगाम १५ दिवस उशिरा सुरू झाल्याने गाळपाला विलंब होत आहे. 
त्यामुळे सभासदांनी थोडा धीर धरून इतर कारखान्याला ऊस घालू नये असेही आवाहन जगताप यांनी केले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सर्व गाळप संपवण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. त्यांनी सांगितले.  सत्काराला उत्तर देताना कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, मला व्हीएसआय च्या मिललेल्या पुरस्कारामध्ये ८० टक्के वाटा हा कारखान्याचे संचालक, सभासद, कामगार तसेच इथल्या मातीचा आहे. कार्यक्रमात कैलास जगताप, धनंजय खोमणे, तुकाराम जगताप यांनी आपली मनोगते व्यक्त केली.   
      प्रास्ताविक कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी केले तर आभार दत्ता माळशिकारे यांनी मानले.
----------------------
संघटनांनी प्रश्न आपआपसात मिटवावेत-----
कारखान्याच्या संबंधित संघटनांनी त्यांचे प्रश्न हे संघटनेनेच चर्चा करून सोडवावेत. जर ते कारखाना प्रशासनाकडे आले तर संचालक मंडळाला सहकार व साखर आयुक्तालयाच्या कायद्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. असे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
To Top