सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनदिनी भोर तालुक्यात सोमवार दि.२२ मद्य व मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली असून याचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले आहे.
प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आयोध्येत होणार असल्याने पूर्ण देशात आनंदाचे उत्सव उत्साहाचे वातावरण आहे.या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशभर दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.यानिमित्त सर्व जाती-धर्मांच्या समाज बांधवांमध्ये शांततेचा व सामाजिक संदेश जावा यासाठी भोर तालुक्यात मद्य विक्री व मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.निवेदन देताना भोर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर बुदगुडे, जिल्हा वकील सेलचे उपाध्यक्ष कपिल दुसंगे, सरचिटणीस समीर बांदल ,अतुल काकडे ,सुशांत लोखंडे ,राहुल गुजर ,अविनाश शिंदे, सौरभ राऊत यांच्यासह श्रीरामभक्त उपस्थित होते.
COMMENTS