सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
जिल्ह्यासह तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे हिरहिरीने काम करून समाज हिताच्या महत्त्वकांक्षी बाबींसाठी कायमच पुढाकार घेणारे भोर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांची जिल्हा ग्रामीण (दक्षिण) कार्यकारणीमध्ये मच्छीमार आघाडी संयोजकपदी निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष पुणे ग्रामीण वासुदेव काळे यांच्या हस्ते १ डिसेंबरला देण्यात आले.पुढील काळात जिल्ह्यातील पक्ष संघटन वाढीसाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सुरेश कांबळे यांनी सांगितले.कांबळे यांचे भोर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.