Baramati News ! स्वयंपाक घरात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेले विज्ञान समजून घ्या ; सीमा पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयांमध्ये बी.आय.एस क्लब च्या वतीने पोस्टर प्रदर्शन व  महिला पालकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 
          या कार्यक्रमांमध्ये 'स्वयंपाक घरातील विज्ञान' याविषयी माहिती देताना सीमा पवार यांनी स्वयंपाक घरातील अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान दडलेले आहे. हे गृहिणीने समजून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री किरण आळंदीकर हे उपस्थित होते त्यांनी भारतीय मानक ब्युरो याची सविस्तर माहिती दिली बाजारात मिळणाऱ्या गृहपयोगी वस्तूंची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने आपल्या मोबाईल मध्ये बी आय एस ॲप डाउनलोड करून घेतले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. सोन्याचे दागिने खरेदी करताना काय काळजी घ्यावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये  वर्षभर असंख्य सण साजरे केले जातात हे सण पर्यावरण पूरक करणे काळाची गरज आहे. दरवर्षी नवीन संक्रांति घेण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर केल्यास मातीची हानी टळेल असे मत प्राजक्ता यादव यांनी व्यक्त केले.
         BIS क्लबच्या विद्यालयातील समन्वयक सुजाता वाबळे यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टरचे प्रदर्शन भरवले होते. घरगुती वापराच्या तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आय.एस.आय मार्क ची पडताळणी कशी करावी याविषयी प्रात्यक्षिका सहित माहिती महिला पालकांना देण्यात आली. या कार्यक्रमासाठी रेखा गडदे, पूजा कांबळे, नंदा हुंबरे,  तेजश्री  फरांदे, शाहीन मनेर, रूपाली सरतापे, शारदा दीक्षित, आरती तांबे, गायत्री भोसले,  चित्रा भोसले, विद्या भोसले यांच्या सह 152 महिला पालक उपस्थित होत्या. विद्या भोसले यांनी सरकारी शाळा कोणत्याही क्षेत्रात मागे नसून आपल्या मुलांना सरकारी शाळेत घालण्याचा आग्रह आपल्या मनोगतातून व्यक्त केला. विद्यालयाचे प्राचार्य संजय कांबळे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयांमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता यादव यांनी केले व आभार नीता इंगळे यांनी मानले.
To Top