सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
निरा येथे अखिल भारतीय मराठा महासंघ , निरा शाखेतर्फे ९ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोना काळात
मोकाट डुकरांमुळे आरोग्य व धार्मिकता धोक्यात येत असल्याने निरा ग्रामपंचायतीसमोर मुंडन आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आठ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
माञ शासनाने २० सप्टेंबर २०२२ रोजी कोरोना काळातील समाजहितासाठी झालेेल्या आंदोलनाच्या केसेस मागे घेण्याबाबत आदेश देऊनही गुन्हे मागे घेण्यात येत नसल्याने तुळशीराम कृष्णराव (टी.के.) जगताप हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी कोणत्याही सहा ठिकाणी आत्मदहन करणार आहेत
याबाबत तुळशीराम जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंञी देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ९ ऑगस्ट २०२१ रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ , निरा शाखे तर्फे निरा गावातील मोकाट डुकरांमुळे आरोग्य व धार्मिकता धोक्यात येत असल्याने डुकरांचे ग्रामपंचायतीने समुळ उच्चाटन करावे या
समाजहिताच्या केलेल्या मागणीसाठी मुंडण आंदोलन केले होते. त्या वेळी आठ कार्यकर्त्यांवर जेजुरी पोलिसांनी कारवाई करीत सासवड येथील न्यायालयात गुन्हे दाखल केले आहेत.
समाजहितासाठी केलेल्या आंदोलनाच्या केसेस मागे घेण्याबाबत २० सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेला आहे.त्यानुसार ३०सप्टेंबर २०२२ रोजी उपविभागी
य पोलिस अधिकारी, भोर उपविभाग,, सासवड व राज्याचे गृहमंञी देवेंद्र फडणवीस यांचेकडे केसेस मागे घेण्याबाबत अर्ज दिला होता.तसेच वेळोवेळी पाठपुरावा करूनही केसेस मागे घेतल्या नाहीत.
न्याय मिळणार नसल्याची जाणीव झाल्याने २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताकदिनी देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेले नागपूर , मंञालय- मुंबई, पोलिस अधिक्षक कार्यालय, पुणे ग्रामिण, पुणे , उपविभागीय पोलिस अधिकारी, भोर उपविभाग, सासवड , जेजुरी पोलिस स्टेशन व निरा पोलिस दुरक्षेञ, ग्रामपंचायत कार्यालय, निरा - शिवतक्रार यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचे तुळशीराम जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी-पुणे, पोलिस आयुक्त पुणे शहर, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामिण, उपविभागीय पोलिस अधिकारी, भोर उपविभाग, सासवड, उपविभागीय अधिकारी, पुरंदर, जेजुरी पोलिस स्टेशन, ग्रामपंचायत, निरा- शिवतक्रार यांच्यासह संबंधितांना देण्यात आल्याचे तुळशीराम जगताप यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------
COMMENTS