सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील वृक्ष तोडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने 'सोमेश्वर रिपोर्टर'ने जावली तालुक्यात वृक्ष तोडीचा हौदोस " मथळ्या खाली वृत प्रसिद्ध केल्यानंतर वन विभाग कामाला लागला असता केळघर विभागात ९० हजाराचा तोडलेला खैर जातीचा माल मेढा वन विभागाने रात्र गस्ती मध्ये जप्त करून साधारण १६ जनांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. गंबरे यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा व इतर अधिकारी, कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मिळालेल्या माहिती नुसार केळघर येथील कातकरी वस्ती नजीक खाजगी मालकी क्षेत्रात खैर जातीचा लाकूड माल असल्याचे समजले. सदर ठिकाणी कारवाई करून खैर जातीचा लाकूड माल व त्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली. सदरच्या लाकूड मालाची किंमत ही सध्याच्या बाजार भावाप्रमाणे अंदाजे ९० हजार एवढी आहे. सदर मालाची चौकशी केली असता केळघर येथील संतोष पार्टे यांनी पालघर जिल्हयातुन १५ मजुर आणून खैर जातीचा लाकूड माल तोडून त्याचे सालपे काढून ठेवला होता. लाकूड व्यापारी संतोष पार्टे रा. केळघर व इतर १५ मजूर यांचेवर गुन्हा नोंद केला असल्याचे माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ए. पी. गंबरे यांनी दिली.
पुढील अधिक तपास उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांचे मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक (वनीकरण) सातारा महेश झांझुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक प्रशिक्षणार्थी अर्चना पाटील, वनक्षेत्रपाल परिविअधिन अभिजीत माने , वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. गंबरे, वनपाल रझिया शेख, वनरक्षक संगिता शेळके, वनरक्षक स्वप्नील चौगुले व कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
------------------------------
वनपरिक्षेत अधिकारी मेढा यांच्याकडून वृक्षतोड परवाना घेऊनच वृक्षतोड करावी व वहातुक पास घेऊनच वहातुक करावी. विना परवाना वृक्षतोड केल्यास व विद्या विना परखाना वहातुक केल्यास वनविभागा मार्फत कारवाई करण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी मेहा श्री. ए. पी. गंबरे यौनी सांगितले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ए. पी. गंबरे
COMMENTS