सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
आमदार जी जी कदम ( आ०णा)यांचं राजकारण मी जवळून पाहिला आहे .पैशापेक्षा त्यांनी माणसे जोडली विविध पदावरून सत्ता भोगताना ,आमदार असताना त्यांनी कधीही राजकारण न करता समाजकारण केल . साधी राहणी व उच्च विचारसरणी त्यांची होती. शांत, संय्यमी ,मनमिळावू स्वभावाचे आ०णा होते .
त्यामुळेच त्यांना आपल्यातून जाऊन 27 वर्षे झाली तरी आजही त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते तेवढेच आहेत हीच त्यांच्या कार्याची व कामाची पोचपावती आहे . त्यांचा वारसा अमित चालवत असून मी सदैव त्याच्या पाठीशी आहे असे आश्वासन श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांनी जी जी कदम (आण्णां) यांचे स्मृतीदिनी आदरांजली वाहाताना व्यक्त केले .
आमदार जी जी कदम प्रतिष्ठानच्या वतीने जावली महाबळेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्व. जी.जी कदम (आण्णा ) यांच्या 27 वा स्मृती दिनाच्या औचित साधून मेढा येथील महात्मा गांधी वाचनालयाचे सभागृहामध्ये आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्या प्रसंगी श्रीमंत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते .
प्रारंभी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते स्वर्गीय आमदार जी.जी कदम यांचे प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कराड तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जितेंद्र डुंबल बोलताना म्हणाले तळागाळापर्यंत शिक्षण पोहचावे, ग्रामीण विद्यार्थी पुढे जावा म्हणून दऱ्याखोऱ्यात शिक्षण संस्था आ०णांनी स्थापली. आजही मुल त्याठिकाणी शिक्षण घेत आहेत. असे सर्वसामान्यासाठी काम करणारे जी जी आण्णा आजही लोकांच्या स्मरणात आहेत. सत्तावीस वर्षानंतरही लोकांचे आण्णांवर तेवढेच प्रेम आजही आहे हे उपस्थित जनतेच्या वरून दिसुन येते असे उद्गार जितेंद्र डुबल यांनी काढले.
लोकशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड , जावली बाजार समितीचे संचालक बुवासाहेब पिसाळ , अॅड.बाळासाहेब बाबर ,माजी जि. प. सदस्य मच्छिंद्र क्षीररसागर ,जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र परामणे यांनी आपल्या भाषणातून जी जी आण्णां यांच्या सहवासातील प्रसंग व्यतीत करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी प्रास्ताविक करताना माजी आ .जी जी कदम प्रतिष्ठाणचे सचिव व माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती अमित कदम म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम असू देत ,क्रीडाक्षेत्रातलं काम असू देत, आरोग्य क्षेत्रात काम असू देत, किंबहुना अध्यात्मिक सुद्धा क्षेत्रातलं काम असू देत ,ज्या ज्या वेळेस आपल्याला समाजापर्यंत जायची संधी मिळाली त्या त्यावेळेस प्रतिष्ठांनने नेहमी अण्णांच्या विचाराचा वारसा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.
ते पुढे म्हणले आम्ही सातत्याने आण्णांच काम पाहिलं ते माणसं घडवणारा कारखाना होता. जिल्ह्यामध्ये आपल्या अनेक मान्यवरांच्याकडे संस्थात्मक रूपाने कारखाने असतील पण कार्यकर्ता घडवण्याची जी फॅक्टरी आहे, जो कारखाना आहे तो केवळ केवळ अन्नाच्या माध्यमातूनच होता असं म्हटलं तर वावग ठरू नये.
अमित कदम पुढे म्हणाले सक्षम कार्यकर्ता कसा असावा त्याला चारित्र्य संपन्नतेची जोड कशी असली पाहिजे आणि त्याच्यावर संस्कार कशा पद्धतीने समाजाचे असले पाहिजेत हे सगळं सांगणारे विद्यापीठ जर कोणाच्या माध्यमातून तर ते अण्णांच्या माध्यमातून होतं असं मला आजही माझे वडील म्हणून जेव्हा मला सांगावयाची संधी मिळते तर ती निश्चित स्वरूपांने गौरव व अभिमान देणारे आहे. असे मला वाटते .असे अमित कदम यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्रशेलार, सातारा तालुका अध्यक्ष शशिकांत वाईकर ,जावली तालुका अध्यक्ष साधू चिकणे, प्रतापगड कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे, किसनविर कारखान्याचे संचालक हिंदुराव तरडे, करण गायकवाड, विजय शेलार, प्रकाश कोकरे ,नामदेव धनावडे, सौ. अंजनाताई कदम, बबनराव वारागडे, प्रताप.पाटील , उदय कदम, भाऊसाहेब पाटणे, सीमा जाधव , संगिता . देशमुख, नितीन पाटील , जितू खानविलकर, शांताराम पार्टे,हणमंत शिंगटे , सुरेश दळवी, विठ्ठलराव पवार, अजित इंदलकर, सुंदर भालेराव, प्रकाश कदम , संजय जुनघरे , अरुण जवळ , मधू शेलार, संदीप पवार आदी मान्यवरांसह जावळी , महाबळेश्वर , सातारा तालुक्यातून विविध राजकिय , सामाजिक , शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकरते उपस्थीत होते.
उपस्थीतांचे स्वागत नारायण शिंगटे, सुत्रसंचलन सुरेश पार्टे तर आभार योगेश गोळे यांनी मानले.